साईकिरण टाइम्स | 21 ऑक्टोबर 2020
श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्यावर बळवंत भुवन इमारतीसमोर अवैधरित्या अतिक्रमण करून टाकलेल्या दोन फेब्रिकेटेज टपऱ्यांवर मुख्यधिकाऱ्यांकडे तक्रार करून कोणतीही कारवाई न केल्यामुळे, नगरपरिषदेसमोर दि. 26 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा, इशारा छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे यांनी दिला आहे.
दरम्यान, यासंदर्भात 'साईकिरण टाइम्स'ने मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी संपर्क करून कारवाईबाबत विचारणा केली असता, मुबंई येथे मंत्रालयात असल्याचे त्यांनी सांगितले.
'साईकिरण टाइम्स'शी बोलताना कोल्हे म्हणाले, शहरातील मुख्य रस्त्यांवरील बळवंत भुवन समोर पदपथावर अवैधरित्या अतिक्रमण करूनदोन टपऱ्या टाकलेल्या असून त्यावर कारवाई करावी, अशी तक्रार मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे केली होती; त्यावर पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे, कारवाई होण्यासाठी पालिकेसमोर उपोषण करणार आहे.
कारवाई चालू आहे. स्थळभेट देऊन कारवाई करण्यात येईल.
-- श्री राम सरगर, नगर अभियंता, श्रीरामपूर नगरपरिषद.