साईकिरण टाइम्स | 4 ऑक्टोबर 2020
अवैध बायोडिझेल पंपावर कारवाई करावी, या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने अन्न पुरवठा मंत्री ना छगन भुजबळ यांची नुकतीच भेट घेतली. ना भुजबळ यांनी कारवाई करण्याचे आश्वासन देत, त्यासंदर्भात चर्चेसाठी पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलवले आहे.
छावा क्रांतीवीर सेनेने हा गंभीर प्रश्न बाहेर काढल्याबद्दल मंत्री भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. अवैध बायोडिझेल पंप व त्यांची वाहने सील केले. परंतु, गुन्हे दाखल करण्यासाठी सह सचिव यांनी काय केले याचा पूर्ण आढावा घेऊन गुन्हे दाखल करू असे ना भुजबळ म्हणाले.
मंत्री भुजबळ यांचा सत्कार छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजाराम शिंदे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिपक कदम, येवला तालुकाध्यक्ष आदित्य नाईक, शहराध्यक्ष विवेक चव्हाण, अजिक्य नाईक, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष योगेश बनसोडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष रवि शेजवळ, नेते शाहिर बनसोडे आदींनी वतीने करण्यात आला.