श्रीरामपूरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर नगरपालिकेत कुत्रे सोडणार

साईकिरण टाइम्स | 20 ऑक्टोबर 2020

श्रीरामपूर शहरात सध्या मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. गल्लोगल्लीत भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त केला नाही तर पालिकेत कुत्रे बांधून ठेऊ, असा इशाराही समाजवादी पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी दिला आहे. 

यासंदर्भात समाजवादी पार्टीच्या वतीने पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन दिले असून त्यात म्हंटले की, मध्यंतरी मोकाट कुत्र्यांमुळे वार्ड नंबर २ मधील दोन व्यक्तींना कुत्रे चावले होते. ही मोकाट कुत्रे गाडी चालकाच्या मागे पळत असल्यामुळे अपघात होतात. रात्री नऊ नंतर सर्व शहरातील रस्ते सामसुम होतात. अशावेळी कोणाला कुठे जायचे असेल तर हे मोकाट कुत्रे त्याच्या अंगावर धावून जाऊन चावण्याचा प्रयत्न करतात. शहरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा समाजवादी पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार,आसिफ तंबोला, अय्यूब पठान, मोसिन शेख, शोएब शाह, अरबाज कुरैशी, दानिश पठान,फरहान शेख, मुबसशिर पठान ज़करिया सैय्यद, गुड्डु जमादार, सोहेल बागवान,तबरेज शेख,अल्तमश शेख,शादाब पठान, फिरोज शाह आदींनी दिला आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post