काही महाभ्रष्टाचार्यांना सुटली खाव,खाव ! शासनाचं वेतन असताना,वरकमाईची हाव !!

 काही महाभ्रष्टाचार्यांना सुटली खाव,खाव !

शासनाचं वेतन असताना,वरकमाईची हाव !!


साईकिरण टाइम्स | 22 ऑक्टोबर 2020

शौकत शेख |श्रीरामपूर  (भाग क्र.१)

                       इन्कलाब 

सध्या प्रत्येक शासकीय कार्यालयात काही भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकारी,कर्मचार्यांनी गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचा कहर मांडला असून शासनाचं मुबलक वेतन असताना देखील वरकमाईसाठी चटावलेल्या या महाभागांना जणू कोणाचेच भय नसल्यागत राजरोसपणे ही मंडळी भ्रष्टाचाराच्या गटारीत सुळक्या घेत आहे, पहिलेच कोरोना संकटाच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये भरडला जाणारा सर्वसामान्य नागरीक आपली उपजीविका चालविण्यासाठी जीवाचे रान करत कसा,बसा तुटपूंज्ये कमाईवर आपला उदरनिर्वाह करत असताना जर आपल्या काही महत्वाच्या कामानिमित्त एखाद्या शासकीय कार्यालयात गेला तर चालून आलेल्या शिकारी प्रमाणे येथील काही भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकारी, कर्मचार्यांकडून अक्षरशःत्यांची लयलूट होताना दिसून येत आहे.

आपली महत्वाची कामे सोडून तथा रोजंदारी बुडवून आपल्या कामानिमित्त काही नागरीक शासकीय कार्यालयात येतात,मात्र त्यांची विना मोबदला (लाच) कामे होईलच याची जराशी देखील अपेक्षा ठेवणे आज सपशेल चुकेचे ठरत आहे. अशा भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळीच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या हवाली केले गेले पाहिजे तरच यांची वरकमाईची हाव नाहीशी होऊन त्यांना सत्यतेचे दर्शन घडेल याकरीता शासकीय कार्यालयातील जो कोणी भ्रष्ट प्रवृत्तीचा अधिकारी,कर्मचारी कामाच्या मोबदल्यात लाच मागत असेल तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून अशा महाभागांना त्यांची योग्य जागा दाखवून दिल्यास मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीवर आळा बसेल हे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

शासकीय कार्यालयातील सर्वच अधिकारी,कर्मचारी असे चुकीचे कामे करतात असे मुळीच म्हणता येणार नाही,कारण शासनाच्या सेवेला केवळ नोकरी न समजता सेवा समजूनच आपली ड्यूटी करणारे चांगले अधिकारी, कर्मचारी देखील अनेक आहेत, मात्र अक्षरशः ते बोटावर मोजता यावे इतकेच,मात्र खादाडांची संख्या ही त्यापेक्षा अधिक पटीने आहे, जनसामान्यांची काबाडकष्टाची कमाई आपल्या खिशात घालताना यांना जनाची नव्हेतर मनाची थोडी तरी वाटली पाहिजे, मात्र ते ही होताना दिसून येत नाही, वरकमाईसाठी जनसामान्यांची कामे आडवून ठेवणे,त्यांना वेठीस धरत वारंवार चकरा मारण्यास भाग पाडणे, त्यांच्या कामांच्या मोबदल्यात लाच खाणे,विना मोबदला कामे आडवून ठेवणे,अशा हातावरच्या  रांजल्या,गांजल्या गोर-गरीबांच्या श्रमाची कमाई जेव्हा हे महाभाग लाच म्हणून घेतात आणि घरी नेतात,तर तीच लाच आजाराच्या स्वरुपाने पुढे उभी ठाकते आणि भ्रष्टमार्गाने कमाललेल्या वरकमाईपेक्षा कितीतरी अधिक पटीने औषोधोपचारात खर्च करण्यास भाग पाडते,कारण गोर-गरीबांकडून घेतलेली लाचेची रक्कम नव्हेतर तो त्यांचा तळतळाट असतो हे ज्यादिवशी लाचखोरांच्या लक्षात येईल त्यादिवसापासून लाचखोरी बंद होईल, म्हणून लाचखोरांनो हे पक्कं लक्षात ठेवा एकतर लाचेच्या रकमेतून आपल्या घरी गंभीर स्वरुपाचे आजार येतील अथवा लाचलूचपत प्रतिबंधकवाले आपणास पकडून तरी नेतील हेच अंतीम सत्य आहे. क्रमश..

         

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post