'श्रीं'चे पावित्र्य व हिंदूंच्या भावनांची हेटाळणी करणाऱ्या पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील; चित्ते

साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | 'कोवीड'च्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने कचरा गोळा करणारी ट्रॅक्टर गणेश मूर्ती संकलन करण्यासाठी विविध भागात पाठवले. 'श्रीं'च्या  पावित्र्याची आणि हिंदूंच्या भावनांची हेटाळणी करणाऱ्या नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा तीव्र निषेध करत,  याचे परिणाम नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी दिला.

           प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चित्ते यांनी म्हटले आहे की, कोवीडच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी नगरपालिकेन एक दिवसाकरता बाजारातील छोटी मालवाहू वाहने भाडोत्री घेऊन गणेश मूर्ती संकलन करण्यासाठी पाठवीणे गरजेचे होते; मात्र,  कुठलीही स्वच्छता न करता कचरा गोळा करणारे ट्रॅक्टर नगरपालिकेने भागा-भागात श्री गणेशाच्या मूर्ती संकलन करण्याकरीता पाठविले. 

             या ट्रॅक्टरट्रॉलीची अवस्था अत्यंत गचाळ आणि घाणेरडी होती. ट्रालीच्या तळाला भोके पडून ट्रॉलीची चाळणी झालेली होती. त्यावर कुठलीही कापड टाकलेले नव्हते, अशा पद्धतीने श्रीगणेशाचे विसर्जनच अपवित्र करणारी व्यवस्था पालिकेने केली होती. हा हिंदूंच्या भावनांशी खेळ असून हिंदू देवदेवतांची हेटाळणी करणारा प्रकार असल्याचे, चित्ते यांनी म्हंटले आहे. 

        गेल्या काही वर्षांपासून नगरपालिकेचे सत्ताधारी हिंदूंच्या सणांचा उत्साहघात कसा होईल, अशी सातत्याने भूमिका घेत आहे. यामुळे श्रीरामपूरात नवरात्र, गणपती, शिवजयंतीच्या मिरवणुका बैलपोळा, गणेश मूर्तीच्या विक्रीची व्यवस्था या साऱ्या पारंपरिक व्यवस्था या कोलमडत असून हिंदूंच्या सणांचा उत्साह संपलेला आहे. यापुढील काळात नगरपालिकेच्या या भूमिकांच्या विरोधात आम्ही मोठे जनआंदोलन उभे करू, असा इशारा श्री चित्ते यांनी दिला आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post