साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 सप्टेंबर 2020
हरेगाव | कुठलेही देवस्थान उघडल्याने कोरोना होत नाही, मात्र गर्दीमुळे कोरोना होउ शकतो त्यामुळे सर्व धार्मिक कार्यास मनाई असल्याचे श्रीरामपूर चे तहसिलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले.
मत माऊली यात्रेच्या पार्श्वभुमीवर प्रशासन, संत तेरेजा चर्च चे धर्मगुरू व उंदिरगाव ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा संयुक्त बैठक संत तेरेजा चर्च येथे संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन व सुचना देताना तहसीलदार बोलत होते. भावीकांनी कोरोना मुळे व शासनाच्या आदेशानुसार दर्शन घेण्यासाठी व नवस पुर्ण करण्यासाठी हरेगाव ला येवू नये असे आवाहन प्रमुख धर्मगुरू फा. पायस यांनी या वेळी केले. ग्रामपंचायत उंदिरगाव व चर्चच्या वतीने फ्लेक्स बोर्डाच्या माध्यमातुन भाविकांना दर्शनासाठी येवू नये असे आवाहन करण्याचे ठरले.
या बैठकीला तालुका पोलीस निरीक्षक खान, मंडल अधिकारी बनकर, ऊंदिरगाव सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, विरेश गलांडे , धिवर सर, अॅड. बागवान, फिलीप पंडीत, सुनिल शिरसाठ, तसेच संजय सोज्वळ, पो. हे. काॅ. बर्डे, पो. काॅ. मोरे, चद्रंकात गायकवाड, दीपक बोधक, सुनिल आव्हाड, आदी उपस्थित होते. यावेळी तहसिलदारांचा रिक्षा युनियनच्या वतीने सुभाष भोसले, मानिक साठे, नुरकलाम तांबोळी यांनी सत्कार केला.