राजकारण्यांना जनतेची काळजी म्हणून नव्हे तर कोरोना साखळी तोडण्यासाठी 'श्रीरामपूर बंद'ला पाठिंबा; कुणाल करंडे

साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर बंदबाबत सर्वांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. 'बंद'बाबत विविध मतांतरे आहेत. माझा श्रीरामपूर 'बंद'ला पाठिंबा आहे; परंतु, हा बंद राजकारण्यांना जनतेची काळजी आहे, आणि त्यांचे सर्व कर्तव्य या बंद मुळे पार पडले यासाठी नाही तर, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आहे, असे मत श्रीराम सेवा संघाचे संस्थापक कुणाल करंडे यांनी व्यक्त केले आहे.

          याबाबत बोलताना करंडे म्हणाले, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सात दिवसाचा बंद काही उपयोगी येणार नाही. शुक्रवारी 92 पेशंट सापडले. यामध्ये अशीच वाढ होत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चार दिवसांमध्ये अशी कोणती मोठी साखळी तुटली जाणार आहे?  असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यासाठी बारा ते चौदा दिवसांचा बंद आवश्यक आहे. तेव्हाच साखळी तुटेल व भविष्यातील पेशंटला इलाजासाठी दवाखान्यांमध्ये जागा मिळेल व गावातील नागरिकांचे जीव वाचेल.

         नगरपालिका प्रशासनाने  शहरात 500 खाटांचे सर्व सोयी युक्त कोवाड सेंटरची सुरुवात करायला हवी. कोरोनाची मोफत तपासणीसाठी देखील शहरात एक सेंटर उघडायला हवे. या कार्यासाठी शहरातील व्यापारी असोसिएशन व सर्व छोटे व्यापारी, राजकीय पक्ष, संघटना देखील यात सहकार्य करतील यात शंका नाही,  असेही करंडे म्हणाले. बंद करण्यामागील उद्देश कोरोणा संसर्ग पसरू नये हा आहे. बाजारपेठ बंद करण्याचा उद्देश गर्दी होऊ नये व त्या गर्दीमुळे संसर्ग पसरू नये हा आहे. बंद ही शिक्षा नाही तर उपयोजना आहे, असे मत श्रीराम सेवा संघाचे संस्थापक कुणाल करंडे यांनी व्यक्त केले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post