जिल्ह्यातील दोन पुढाऱ्यांचे वाद 'असे' मिटले

साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 सप्टेंबर 2020
बेलापूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर तालुक्यातील दोन पुढाऱ्यांचे राजकीय वाद पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षीने मिटविण्यास टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष व बेलापूर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा यांना यश आले.

     जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यातील वाद तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला माहीती आहे. दोनही नवले एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करण्यात अघाडीवर असतात. ग्रामपंचायत कार्यालयापासुन ते जिल्हा परिषदेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने एकमेकांविरोधात करण्यात आली होती.  दोघांचेही वाद अतिशय विकोपाला गेले होते. कित्येक वेळा हमरा तुमरीचे प्रकार झाले होते. काल तर या सर्वाचा कळस झाला. ग्रामपंचायत कार्यालयात झालेली बाचाबाची लाठ्या-काठ्या पर्यत पोहोचली. दोघांच्याही नातेवाईकात भर चौकात हाणामारी झाली. त्यानंतर तक्रार देण्याकरीता पोलीस स्टेशनला गेल्यावरही दोघांचेही नातेवाईक पुन्हा आपापसात भिडले. त्याचवेळी बेलापूर पत्रकार सांघाचे खजिनदार सुनिल मुथा तेथे पोहोचले दोन्ही गटात चाललेल्या मारामाऱ्या पोलीस उपनिरीक्षक उजे, बेलापूरचे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे,  साईनाथ राशिनकर, निखील तमनर, पोपट भोईटे, हरिष पानसंबळ व सुनिल  मुथा यांनी बळाचा वापर करुन सोडविल्या. त्यावेळी फार मोठा जमाव जमला होता. आता दोघावरही गुन्हे दाखल होणार किती जणांना अटक होणार याची चर्चा रंगत असतानाच सुनिल मुथा यांनी शरद नवले व सुधीर नवले यांना घटनेच्या गांभीर्याची जाणीव करुन दिली. तुमच्या दोघात असलेल्या वादाचे परिणाम दोन पिढ्यांना भोगावे लागतील. फालतु भांडणात तुमचे कुटूंब उध्वस्त होतील. त्यामुळे दुरचा विचार करुन हे वाद सोडून द्या, असे उपविभागीय अधिकारी राहुल मदने व सुनिल मुथा यांनी सुचविले. अन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने,  पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या समक्ष दोघांनीही आपापली चुक कबुल करत माघार घेतली. सुनिल मुथा यांनी केलेल्या मध्यस्थीला यश आले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post