साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 सप्टेंबर 2020
'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या मोहिमेकरीता आमदार लहू कानडे यांच्या प्रेरणेतून माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे साहेब मित्र मंडळ व युवक काँग्रेसच्या वतीने उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या पुढाकारातून शहरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी १६ ऑक्सिमिटर आज नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी कविटकर यांच्याकडे सुपूर्द केले.
श्रीरामपूर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी काल आपले कुटूंब आपली जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ केला व शहरातील सर्व प्रभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पथकं तयार केली. आज प्रत्यक्षात आज जेव्हा तपासणी कामी कर्मचारी आले तेव्हा त्यांच्याकडे तपासणीचे अपुरे साहित्य दिसून आले. याबाबत पालिकेच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले की, पालिकेकडे केवळ सात ऑक्सिमिटर आणि सात थर्मल गण आहेत त्यादेखील आमदार लहू कानडे यांच्या निधीमधून मिळाल्या आहेत. सात ऑक्सिमिटरवर एक लाख लोकांच्या कशा तपासण्या होणार याचा विचार न केलेलाच बरा.
यावेळी करण ससाणे म्हणाले की, करोना आजाराचा सामना करतांना नगरपालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. पालिकेच्या माध्यमातून कुठल्याच ठोस उपाय योजना केल्या गेल्या नाही. श्रीरामपूर शहरातील प्रत्येक नागरिकांची चांगल्या प्रकारे आरोग्य तपासणी व्हावी याकरिता आज सोळा ऑक्सिमिटर मशीन पालिकेकडे देण्यात आल्याचे म्हणाले.
माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे म्हणाले, श्रीरामपूर पालिकेच 1 बजेट १५० कोटींचे आहे. असे असतांना नगराध्यक्षा व सत्ताधार्यांच्या निष्क्रियते मुळे आज शहराची वाताहत झाली आहे. आरोग्याच्या प्रश्नांबरोबर मुख्य रस्ते, पिण्याचे पाणी यासारखे महत्त्वाचा विषयांबाबत नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सत्ताधारी करत आहे त्यांचा आम्ही निषेध करतो.
मार्केट कमिटीचे माजी सभापती म्हणाले की, करोनाच्या संकटाबाबत पालिका प्रशासन व सत्ताधारी गंभीर नाहीत तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व.ससाणे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार लहू कानडे व करणदादा ससाणे काम करत आहे नुसतंच फोटो सेशन अन भाषणं न करता प्रत्येक्षात मदत करण्याची भूमिका करण ससाणे यांनी घेतली आहे.
तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धार्थ फंड यांनी आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, मार्केट कमिटीचे माजी सभापती सचिन गुजर, जेष्ठ नगरसेवक दिलीप नागरे, मनोज लबडे, सुहास परदेशी, प्रतीक बोरावके, मनोहर फरगडे, प्रताप गुजर यांच्यासह आदी उपस्थित होते.
श्रीरामपूर पालिकेचे सुमारे १५० कोटींचे बजेट आहे, तर शहराची लोकसंख्या लाखांवर आहे; असे असतांना नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी फक्त सात ऑक्सिमिटर ते सुध्दा आमदार कानडे यांच्या निधीतले आहे. मंग पालिका प्रशासन नेमकी करते तरी काय? असा सवाल उपस्थित होतो आहे.