शफीक बागवान यांजकडून
बेलापुर | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकाराच्या परिवाराला ५० लाखांची मदत करावी, रुग्णालयात पाच टक्के खाटा पत्रकारांसाठी राखीव ठेवाव्यात आणि शासनाकडून ओक्सिमीटर देण्यात यावे, अशी मागणी बेलापुर पत्रकारांकडून जिल्हाधिकारी राहुल द्वीवेदी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या परिवाराला ५० लाखांची मदत करावी, त्यासाठी अधिस्वीकृतीची अट ठेवू नये, पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू उपचार वेळेवर न झाल्याने झाला. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नियुक्त करावी, अशी मागणी करण्यात आली असून त्याची लवकरात लवकर आमलबजावणी करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
याबरोबरच जिल्ह्यातील सर्व विलगीकरण कक्षात पत्रकारांसाठी स्वतंत्र कोरोना उपचार कक्ष सुरू करावा, माथेरान येथील महाराष्ट्र न्यूज २४ चे संपादक संतोष पवार व गेवराई येथील कोरोनाने मृत झालेल्या संतोष भोसले यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक भरगोस मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेण्यात येईल, असे जेष्ठ पत्रकार भास्कर खंडागळे, राम पोळ, शफीक बागवान, रणजीत श्रीगोड, सुनील मूथा, विष्णुपंत डावरे, प्रदीप आहेर, दीपक क्षत्रीय, सुहास शेलार, दिलीप दायमा, रुपेश सिकची, प्रा. प्रकाश देशपांडे, प्रा. ज्ञानेश्वर गवले, राजू शेख, प्रकाश शेलार, शरद पुजारी, आदींनी म्हटले आहे.
Tags
पत्रकार