पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त बेलापूरात रक्तदान शिबीर


साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 सप्टेंबर 2020

बेलापुर (प्रतिनिधी) सर्व श्रेष्ठ दान म्हणजे देहदान नेत्रदान रक्तदान व कन्यादान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन निश्चितच अनेकांना प्रेरणादायी ठरेल,  असे उदगार अध्यात्मिक समन्वय अघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव मुठे यांनी काढले.      


             भारतीय  जनता पक्षाच्या श्रीरामपुर तालुका शाखेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने बेलापुरातील जैन मंदिर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मुठे बोलत होते.  जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आली या वेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे सुनिल मुथा जि प सदस्य शरद नवले अशोक कारखान्याचे संचालक  अभिषेक खंडागळे हे मान्यवर उपस्थित होते. 

 

            या वेळी ३५   रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे भाग्यश्री व योगेश शिंदे या उभयंतानी रक्तदान केले पत्रकार विष्णूपंत डावरे यांच्या वतीने उपस्थितांना मास्कचे वाटप करण्यात आले या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल वाणी माजी तालुकाध्यक्ष अनिल भनगडे माजि शहराध्यक्ष मारुती बिंगले युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल यादव युवा मोर्चा चिटणीस विशाल अंभोरे  प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड दिलीप काळे  मारुती राशिनकर राम पौळ रविंद्र खटोड रविंद्र कोळपकर अरविंद शहाणे दिलीप दायमा किशोर खरोटे अरुण धर्माधिकारी  प्रसाद लढ्ढा  मुकुंद लबडे महेश खरात पप्पू कुलथे अक्षय कावरे विशाल गायधने  आदि उपस्थित होते जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने डाँ.दिलीप दाणे डाँ.विलास मढीकर श्रीमती धामणगावाकर त्रिवेणी माहुरे के पी यादव बाळासाहेब खरपुडे यांनी रक्तदानाचे काम चोख पार पाडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे पप्पु पौळ सुरेश बढे ओमप्रकाश व्यास राकेश कुंभकर्ण सागर ढवळे महेश खरात रमेश अमोलीक आदिंनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पुरुषोत्तम भराटे यांनी केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार व्यक्त केले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post