साईकिरण टाइम्स ब्युरो, 21ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | वंचित बहुजन आघाडी श्रीरामपूरच्या वतीने शुक्रवारी (दि.21) श्रीरामपूर बस स्थानकातील वाहक, चालक व स्थानक प्रमुख कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा शेख, प्रकाश सावंत, तुकाराम धनवडे, सुगंधराव इंगळे, आनंद मेढे, गौतम राऊत, अमोल सोनवणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी 12 ऑगस्टला महाराष्ट्रातील एसटी बस सेवा सुरू कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली बजाव आंदोलन केले होते. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेत सार्वजनिक वाहतूक सेवा व एसटी बस सेवा चालू केली, असे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.