साईकिरण टाइम्स ब्युरो, 7 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा या ठिकाणी पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मनुवादीवर कठोर कारवाई करावी; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा, भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मगर यांनी पुढे म्हंटले आहे की, ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले, सर्वांना समान अधिकार दिले, सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खूप काही केले त्या महामानवाची विटंबना करण्यात आली हे खूप दुःखदायक आहे. सरकार सांगतय आरोपी हा मनोरुग्ण आहे. मग, मनोरुग्णांना इतर काही दिसत नाही का ? नुकतीच मुंबई येथे राजगृहाची तोडफोड करण्यात आली. काय चाललंय या महाराष्ट्रात? हे थांबल नाही तर आंबेडकरी जनता शांत बसणार नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असेही मगर यांनी म्हंटले आहे. सरकारने जनतेचा अंत पाहू नये, विटंबना करणाऱ्या मनुवादी आरोपीवर कठोर कारवाई करावी; अन्यथा भीमशक्ती संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा मगर यांनी दिला आहे.
'साईकिरण टाइम्स' > बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा
'साईकिरण टाइम्स' > बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी फेसबुक पेज लाईक करा