साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 ऑगस्ट 2020
बेलापूर (प्रतिनिधी) कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता गावातील नागरीकांची रक्षा करणाऱ्या बेलापूर पोलीस दादांना फेस गार्ड, सँनिटायझर, मास्क देवुन बेलापूरातील महीलांनी रक्षाबंधन सण साजरा केला.
रक्षा बंधन हा सण बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण या दिवशी बहीण भावाला राखी बांधते बेलापूर पोलीस स्टेशनला दर वर्षी जेष्ठ पत्रकार देविदास देसाई याच्या संकल्पनेतून रक्षा बंधन साजरा केला जातो. यावर्षी कोरोना काळात अहोरात्र झटणाऱ्या आपल्या गावाचे दादा म्हणजे पोलीस दादा पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, साईनाथ राशिनकर, हरिष पानसंबळ, पोपट भोईटे, निखील तमनर तसेच पोलीस पाटील आशोक प्रधान यांना फेस गार्ड सँनिटायझर मास्क देवून राखी बांधुन रक्षा बंधन साजरा करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच भरत साळुंके, बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले, अकबर टिन मेकरवाले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सौ.प्रतिभा देसाई, सौ. ज्योती भांड, सौ.संगीता देसाई, सौ.सोनाली ओहोळ, साक्षी ओहोळ, अशोक गवते, पाणी पुरवठा समीतीचे उपाध्यक्ष मनोज श्रीगोड, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप दायमा, कैलास देसाई, अतिश देसर्डा, किरण भांड, प्रकाश जाजू, महेश ओहोळ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर पोलीस नाईक यांनी आभार मानले.