साईकिरण टाइम्स ब्युरो, 2 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | प्रतिनिधी | संगमनेर तालुक्यातील साकुर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्था संचलित मातोश्री बदामबाई फिरोदिया माध्यमिक प्रशाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी दहावी बोर्ड परीक्षेत मातोश्री बदाम बाई फिरोदिया प्रशालेचा निकालात दबदबा कायम राहिला तर दहावी परीक्षेचा निकाल 98.75% लागला असून अनुक्रमे प्रथम कढणे प्रतीक्षा मधुकर 94. 60% द्वितीय क्रमांक शेख फरदीन दिलावर 92. 80 % तृतीय - वाडेकर सुबोध शिवाजी 91.20% गुण प्राप्त झाले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष श्री इंद्रजीत पाटील खेमनर, उपाध्यक्ष श्री शंकरराव पाटील खेमनर, सर्व संचालक मंडळ, सेक्रेटरी श्री भाऊसाहेब पाटील सागर रजिस्ट्रार श्री होळकर सर प्राचार्य श्रीमती जमादार मॅडम प्राथमिक मुख्याध्यापक श्री घुगरकर सर सामाजिक कार्यकर्ते श्री दिलावर शेख सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक ग्रामस्थांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
Tags
शैक्षणिक