साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 ऑगस्ट 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) 'जग बदल घालून घाव , सांगून गेले आम्हां भीमराव', हा समाज क्रांतीचा मंत्र देणारे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जन्म शताब्दी बेलापूर येथे समाज बांधवांमध्ये मिठाई वाटून मोठ्या उत्साहानं साजरी झाली. यावेळी विविध पक्ष व सामाजिक संघटनांकडून आण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बेलापूर ग्रामपंचायत ,बेलापूर पोलीस औट पोस्ट , व समता स्पोर्टस् क्लब यांचे वतीने श्रीरामपूर पंचायत समिती सदस्य अरूण पा.नाईक , कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सुधीर नवले , माजी सरपंच भरत साळुंके , पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे , सरपंचा राधाताई बोंबले , ग्रामपंचायत सदस्या सुभद्राबाई शेलार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समता स्पोर्टस् क्लबच्या वतीने मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
या प्रसंगी अरूण पा. नाईक , सुधीर नवले , भरत साळुंके , संजय शेलार विजय शेलार यांनी आण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करून जन्म शताब्दी निमित्त त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे अशी मागणी केली. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नाईक , पो.कॉ.निखिल तमनर , रमेश शेलार , बाबासाहेब शेलार , बापूसाहेब पुजारी , सुभाष राशिनकर , रमेश अमोलिक , भाऊसाहेब तेलोरे बन्टी शेलार , गंगा शेलार , दानियल शेलार , बाळासाहेब शेलार , नंदू शेलार , सुहास शेलार , अशोक शेलार , श्रीमती सखूबाई शेलार , श्रीमती हौसाबाई शेलार , श्रीमती मंगलबाई शेलार , सौ. वेणूबाई शेलार आदी समाज बांधव उपस्थित होते.
Tags
ताज्या घडामोडी