साईकिरण टाइम्स ब्युरो, 2 ऑगस्ट 2020
सात्रळ | प्रतिनिधी | राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील भगिरथी ट्रस्टचे आनंद गुरूकुलमध्ये शिक्षण घेत सिद्धी संदिपराव वाघचौरे हिने ९०.२० गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळविला. याबरोबरच अनेक प्रकारच्या स्पर्धा परिक्षेतही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.
तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.अरुण कडू पा.,स्कुलचे चेअरमन मा.के.के.बोरा,मुख्यध्यापिका मा.सौ.कोळेकर मॅडम सोसायटीचे चेअरमन मा.योगेशजी चोरमुंगे,अॅड. मा.विजयराव कडु पा., संभाजीराव चोरमुंगे,सात्रळचे उपसरपंच गणेश कडु पा.,सोनगाव चे उपसरपंच किरण अंत्रे पा. आदिनी कौतुक केले. श्री.संत सेना महाराज संघटना सात्रळ अध्यक्ष तसेच एल आय सी विमा प्रतिनिधी मा.संदीप वाघचौरे यांची ती कन्या अाहे.परिसरातील सर्वच क्षेत्रामधुन सिद्धीचे कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.
Tags
शैक्षणिक