नगर-मनमाड रस्ता तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा अधिकाऱ्यांना कोंडून टाकू :'प्रहार'चा इशारा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 ऑगस्ट 2020
राहुरी | नगर-मनमाड रस्ता तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा संबंधित विभागाला टाळे  ठोकण्यात येईल. ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांना कोंडून घेण्यात येईल, असा आक्रमक आंदोलनाचा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आला आहे. 

               राहुरी कारखाना परिसरातील नागरिक, प्रवासी व राहुरी कारखाना प्रहार जनशक्ती पक्षाचे अमित देशमुख गोविंद खवडे, कैलास पवळ, विजय लोंढे, ऋषी सोनवणे, आकाश चाबुकस्वार, शुभम कुंभार, आदींनी राज्यमंत्री श्री.बच्चू कडू यांचा सामाजिक सेवेचा वारसा घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांना जनतेच्या वतीने निवेदन दिले. 

            दरम्यान, पोटे यांनी जागतिक बँक प्रकल्प विभागाचे श्री.भांगे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. 17 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण होईल असे भांगे यांनी आश्वासन दिले. रस्त्याचे काम झाले नाही तर संबंधित अधिकारी यांना कोंडून, त्यांचे दालनास टाळे ठोकू, असा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आला आहे. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, जिल्हासंघटक बाळासाहेब खर्जुले उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post