तनपुरे कारखान्याच्या अध्यक्षपदी ढोकणे तर उपाध्यक्षपदी ढूस यांची निवड

साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 ऑगस्ट 2020
राहुरी फॅक्टरी (ऋषि राऊत) राहुरी तालुक्याची कामधेनु असणाऱ्या डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या नूतन चेअरमनपदी राज्याचे माजीमंत्री राधाकृष्ण  विखे यांचे उंबरे येथील व्याही नामदेवराव ढोकणे यांची तर व्हॉइस चेअरमनपदी देवळाली प्रवरा येथील दत्तात्रय ढुस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

              गेल्या पंधरा दिवसापूर्वी कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील व व्हाईस चेअरमन शामराव निमसे यांनी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार आपल्या पदाचे राजीनामे दिले असता चेअरमन पदी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांचे व्याही नामदेव ढोकणे यांचे नाव अंतिम होते. मात्र,  व्हॉइस चेअरमन कोण याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या. कारखान्याच्या नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन निवडी संदर्भातील बैठक आज कारखाना कार्य स्थळावरील मिटींग हॉल मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी रामेंद्र  कुमार जोशी यांच्या अधिपत्याखाली पार पडली. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक खासदार सुजय दादा विखे पाटील हे उपस्थित होते. यावेळी चेअरमन म्हणून नामदेवराव ढोकणे यांच्या नावाची सूचना उदयसिंह पाटील यांनी मांडली तरत्यास यांनी अनुमोदन शामराव निमसे यांनी दिले. त्यानंतर व्हाईस चेअरमन पदासाठी दत्तात्रय ढुस यांच्या नावाची सूचना महेश पाटील यांनी मांडली. त्यास संचालक अशोक खुरुद  यांनी अनुमोदन दिले. यावेळी स्वीकृत संचालकपदी सुभाष वराळे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, पुढील वर्षी कारखान्याची निवडणूक असल्याने नूतन चेअरमन म्हणून नामदेवराव ढोकणे व व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस यांना १ वर्षासाठी संधी मिळणार असून यंदा कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने हा गळीत हंगाम मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. त्याबरोबर आर्थिक संकटातून देखील कारखाना मोठ्या प्रमाणामध्ये सावरण्याच्या दृष्टीने नवनियुक्त पदाधिकारी यांच्या समोर आव्हान असणार आहे.

         दरम्यान,  निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा खा.सुजय विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेळी कारखान्याचे मावळते चेअरमन उदयसिंह पाटील मावळते व्हाईस चेअरमन शामराव निमसे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश दादा करपे राहुरी दूध संघाचे चेअरमन तान्हाजी धसाळ , संचालक सुरसिंग पवार मच्छिंद्र तांबे, केशवराव पाटील, महेश पाटील, विजय डौले , उत्‍तमराव आढाव ,बाळकृष्ण कोळसे, भारत तारडे ,मधुकर पवार ,नंदकुमार डोळस ,रवींद्र म्हसे अर्जुन बाचकर, शिवाजी सयाजी गाडे, अशोक खुरुद सौ पार्वतीबाई तारडे , श्रीमती हिराबाई चौधरी, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. एन.सरोदे यांच्यासह दत्तात्रय खुळे, हरिभाऊ खुळे,डी. आर. खुळे, प्रकाश आढाव, बाबासाहेब कार्ले, सुदाम कार्ले, प्रवीण आढाव, नितीन आढाव आदी उपस्थित होते. दरम्यान उंबरे गावाला पहिल्यांदा कारखाना चेअरमन पदाचा मान तर देवळाली प्रवराला प्रथमच व्हाईस पद मिळाल्याने या गावातील कार्यकर्त्यांनी यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांच्या सत्कारासाठी मोठी गर्दी केली होती.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post