साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 ऑगस्ट 2020
वाकडी | अहमदनगर जिल्ह्याची जेजुरी म्हणून पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले राहता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा मंदिर उघडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोते यांनी केली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून कोरोना आजाराने सर्वत्र मंदिर बंद आहे. बहुतेक ठिकाणची मंदिर खुली करण्यात आली नाही. यामुळे बहुतेक मंदिरातील विविध यात्रा उत्सव बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या सर्वत्र मोजक्या लोकांमधे मास्क व सोशल डिस्टन्स ठेऊन लग्न कार्य सुरु आहे. नवविवाहित जोडपे लग्न होताच प्रथम खंडोबा चरणी लिन होऊन संसाराला सुरुवात करतात. अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक नवविवाहित जोडपे जेजुरी न जाता राहता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा मंदिरात दर्शनास येतात. परंतु, गेली चार महिने पासून खंडोबा मंदिर बंद असून भाविकांची गर्दी मंदावली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे अनेक भक्त आहे. वाकडी येथील खंडोबा देवाचे हजारो भक्त असून या खंडोबा मंदिरात मास्क सेनिटायझर व सोशल डिस्टन्स आदी नियमावली नुसार मंदिर खुले करावे, अशी मागणी आमदार आशुतोषदादा युवा मंचचे आण्णासाहेब कोते यांनी केली आहे.