शिरसगाव (वार्ताहर) हरिगाव फाट्यावर शिरसगाव हद्दीत अशोकनगर नवीन पोलीस चौकी झाल्याने परिसरातील गुन्ह्याचे, लुटमारीचे,गंठण चोरी सारख्या घटना प्रकाराना बराच आळा बसला असताना शुक्रवारी श्रीरामपूर उड्डाणपुलावर गंठण चोरीचा प्रकार दुपारी ४ वाजता घडला.
भोकरकडे जाणाऱ्या दुचाकीवरील सुनिता आहेर या महिलेच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे गंठण (मंगळसूत्र) चोरट्यांनी ओरबडून नेले व सदर चोरटे हे हरिगाव फाट्यावरून नवीन आरटीओ कार्यालयाकडे गेले असल्याचे समजले. घटना घडल्यावर तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे,पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट,पोलीस उप निरीक्षक संतोष बहाकर,यांनी हरिगाव फाटा अशोकनगर पोलीस चौकीस भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. संबंधिताकडून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास तातडीने करण्यात येत असून चोरटे लवकरच हाती येतील असा अंदाज आहे.नवीन चौकीवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यामुळे लवकरच चोरीचा तपास लागेल असा अंदाज आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संतोष बहाकर,पो.कॉ किरण पवार,महेश राशिनकर गृहरक्षक दल व सहकारी पुढील तपास करीत आहेत.असाच प्रकार बेलापूर भागात याच दिवशी घडला आहे.