किराणा दुकानात तांदूळ घेण्याच्या बहाणा करत २७ हजाराचा मोबाईल लांबविला; चोरटे सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद

                   
साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 जुलै 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | कोल्हारच्या दिशेने 2 जण मोटारसायकल वर आले...उक्कलगाव येथील शाळेच्या गेटसमोर असणार्‍या पप्पू किराणा दुकानात गेले...त्या दोघांनी तांदूळ घेण्याचा बहाणा केला....अन....हातचालाखिने २७ हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल लांबविला....ही नाट्यमय घटना श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे मंगळवारी (दि.7) सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली. हा प्रकार समोरच असणाऱ्या शाळेच्या सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

           येथील किराणा दुकानदार सुहास फुलपगार यांना तांदुळ देण्याची मागणी त्या दोन चोरट्यांनी केली होती. तेवढ्यात तांदुळ देण्याच्या बहाण्याने अज्ञात चोरट्यांनी कपाटातून २७ हजारचा रूपयाचा विवो कंपनीचा  मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हात चलाखीने लांबविला. अज्ञात चोरटे हिंदी भाषिक असल्याने त्या किराणा दुकानदाराला त्यांची भाषा समजली नव्हती. काही वेळ झाल्यांनतरच ते अज्ञात दोघे चोरटे शाईन मोटारसायकल वरून किराणा माल न घेताच बेलापूर दिशेने पसार झाले. त्यांनतर दोघा चोरटयांचा किराणा दुकानदाराला संशय आला. किराणा दुकानदारने लगेच कपाटात ठेवलेला  मोबाईल पाहीला असता मोबाईल चोरट्याने लांबविला असल्याचे समजले. त्या किराणा दुकानदाराला दुकानाबाहेर येऊ पर्यत ते दोघेही दुकानापासून पसार झाले होते. चोरी झाल्याची कळताच नागरिकांची गर्दी झाली. त्यांनी लगेच शाळेच्या गेटवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात पाहीले असता, त्यात दोन अज्ञात विनानंबरच्या शाईन मोटारसायकल वरून आल्याचे दिसत होते ; पंरतू कॅमेर्‍यात दोघेही अस्पष्ट दिसत होते. याप्रकरणी घडलेल्या चोरीची झाल्याची माहिती बेलापूर पोलिसांना सुहास बाबुराव फुलपगार  (रा.उक्कलगाव ता श्रीरामपूर ),यांनी पोलिसांना  फिर्याद दिली. सदरचा घडलेला चोरीचा झाल्याचा प्रकार (दि ७) मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भरदिवसा उक्कलगाव येथे घडला. याप्रकरणी अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निखिल तमनर अधिक तपास करीत आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post