साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 जुलै 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबई येथील निवासस्थान राजगृह वरील हल्लेखोरास अटक करून या कृत्यामागील सुत्रधाराचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी बेलापूर रिपाईचे अध्यक्ष रमेश अमोलिक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बेलापूर पोलीस दूरक्षेत्राचे पो.ना.रामेश्वर ढोकणे यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की , महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी समाजविघातक विकृत मानसिकता असलेल्या प्रवृत्ती कडून झालेला हल्ला हा निषेधार्य असून या घटनेमागे असलेल्या प्रवृत्तींचा शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शासन करावे.राजगृह हे तमाम आंबेडकरी जनतेचे उर्जास्रोत आहे.या निवासस्थानी केलेली तोडफोड ही निंदनीय असून पुढील धोका ओळखून राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरातील सदस्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी तसेच राजगृहा बाहेर २४ तास पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवास समजून घेण्यात देश कमी पडत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. डॉ.आंबेडकरांच्या पवित्र स्थळाची विटंबणा करणाऱ्या माथेफिरूला लवकरात लवकर जेरबंद करून या मागील सुत्रधाराचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी बेलापूर रिपाईचे शहर अध्यक्ष रमेश अमोलिक , वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सागर खरात , बेलापूर पोलीस दूरक्षेत्राचे पो.ना.रामेश्वर ढोकणे , पोलीस कर्मचारी भोईटे , तमनर , पानसंबळ , पत्रकार अशोक शेलार , किशोर कदम , यांचेसह रिपाईचे मयूर खरात , सचिन खरात , प्रमोद अमोलिक , बाबा दिवे , सागर साळवे , आदि कार्यकर्ते उपस्थित होते.