साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 जुलै 2020
श्रीरामपूर | शहरात शुक्रवारी मध्यरात्री गोमातेसह इतर प्राण्यांचा तडफडून संशयास्पद मृत्यू झाला असून, या घटनेची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याकडे करण्यात आली आहे.
गोमातेसह सर्व प्राण्यांचा पंचनामा, अंत्यविधी करावा..
दि. 16 जुलै रोजी मध्यरात्री गोमाता व इतर प्राण्यांचा मृत्यू झाल्यामुळे शहरातील डावखर रोड परिसरातील नागरिक व हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्राण्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे परिस्थितीवरून जाणवत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. या गोमातेसह इतर सर्व प्राण्यांचा पंचनामा करून त्यांचा अंत्यविधी करावा व या घटनेची कसून चौकशी करावी. दोषी आढळ्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे रुपेश हरकल, नगरसेवक रवी पाटील, योगेश ओझा, कृष्णा करपे, अर्जुन आदिक, सुरज यादव, आबासाहेब लबडे, किशन टाकटे, सतीश सौदागर, सचिन बाकलीवाल, अमोल नानुस्कर, अंकुश जेधे, कुणाल कांबळे, हेमंत मोहिते, रोहित भोसले, आशिष इंगळे, देवेंद्र गोरे आदींनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.