संत गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह नारळ पुणतांबा येथे प्रदान ; १७३ वर्षापासून सप्ताहाची परंपरा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 जुलै 2020
शिरसगाव ( वार्ताहर )श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा १७३ वा अखंड हरीनाम सप्ताह महंत रामगिरी महाराज यांची मंजुरीने आयोजित करण्यात आला होता; परंतु, कोरोना संकटामुळे शासकीय आदेश पाळून भाविकांची गर्दी टाळून हा सप्ताह श्री क्षेत्र सरला बेट येथे होणार असल्याची घोषणा महंत रामगिरी महाराज यांनी पुणतांबा येथे सप्ताहाचे आषाढी  एकादशी दिनी नारळ देताना केली. 

                 यावेळी पुणतांबा मंदिर बंद होते.महंत रामगिरी महाराज यांच्या  हस्ते आ.रमेश बोरनारे व कमिटीला १७३ व्या योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताहाचे परंपरेप्रमाणे नारळ देण्यात आले. यावेळी महंत रामगिरी महाराज म्हणाले की या सप्ताहाचे वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक वर्षी या सप्ताहाला ७ दिवसात २५ ते लाख भाविक येऊन जात असतात. ८ ते 10 हजार टाळकरी असतात. ते रात्रंदिवस भजन करीत असतात. ज्याप्रमाणे आम्ही वारकरी पंढरपूरला वारीला जातो त्याला कोणतेही आमंत्रण नसते. गंगागिरी महाराज हे आराध्य दैवत आहे.वारीला गेलेच पाहिजे अशी भावना असते. १७३ वर्षापासून ही सप्ताहाची परंपरा आहे.ती खंडित होऊ नये त्याकरिता छोट्याशा स्वरुपात आपल्याला सप्ताह करावा लागेल.कोरोना संकटामुळे दरवर्षीप्रमाणे भव्य गर्दी होणार नाही.शासकीय आदेशाचे पालन आपण सर्वांनी केले पाहिजे.ते आपल्या हिताचे आहे.स्वत:ला जपले पाहिजे.त्यामुळे हा सप्ताह श्रीक्षेत्र सरला बेटावर दिनांक २४ ते ३१ जुलैपर्यंत होईल.त्याचे नारळ पुणतांबा येथे देण्यात येते. तसा सप्ताह शिरसगावकराना दिला होता.तशी तयारीही झाली होती.तेथे सप्ताह केला तर तेथे कंट्रोल करता येणार नाही.म्हणून या बेटावरच सप्ताह होईल.यावेळी समाज नसेल भजने होतील,फक्त दहा भजनी एक दोन मीटर अंतर ठेवून राहतील.शासनाने दिलेल्या आदेशानुसार कार्यक्रम होतील.ते कार्यक्रम सोशल मिडिया,टिव्ही चानेल,गुगल आदी माध्यमातून घरबसल्या पहावयास मिळतील.त्याचा आनंद घरीच घ्यावा.व दर्शन घ्यावे.बेटावर भाविकांनी कोणी येऊ नये. सध्याच्या संकटाचा विचार करावा असे महंत रामगिरी महाराज यांनी यावेळी सांगितले.

             यावेळी आ.रमेश बोरनारे,कडूभाऊ काळे,कापसे,कमलाकर कोते,बाबासाहेब चिडे,मधु महाराज,किशोर थोरात,संदीप पारख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नारळ स्वीकारल्यावर आ.रमेश बोरनारे म्हणाले की,  मला व कमिटीला महंत रणगिरी महाराज यांच्या हस्ते नारळ दिले त्या आधी १३ जुलै रोजी बेटावर बैठक घेतली होती. आगळा वेगळा सप्ताह करण्याचे ठरले. १९ जुलै रोजी परंपरेप्रमाणे बेटावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. महंत रामगिरी महाराज यांचे दररोज कीर्तन राहील पण भाविक नसतील.त्याचे प्रक्षेपण घरी बसून पाहावे.असे आवाहन केले.शिरसगावकरांची अशी अपेक्षा होती की सप्ताहसुद्धा आम्ही बेटावरच शासकीय नियम पाळून महंत रामगिरी महाराज यांच्या आदेशानुसार संपन्न केला असता.पण आता पूर्ण नियोजन झाल्याने सप्ताह विषयाला पूर्णविराम मिळाला.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post