साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 जुलै 2020
घोडेगाव (दादा दरंदले) कोरोनाचे सावट साऱ्या देशावर घोंघावत आहे. दिवसागणिक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यासाठी जोमाने कामाला लागले आहेत. सोशल डिस्टंसिंगचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही अनेकजण या नियमांना बगल देत असल्याचे समोर आले आहे.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सोनई पोलीस स्टेशन चे स पो नि जनार्दन सोनवणे व त्यांची टीम फिरत असताना घोडेगाव चौफुला येथे विनाकारण फिरत असलेले व तोंडाला मास्क नसणाऱ्या 12 व्यक्तींवर भा.द.वी.कलम 188,269,270 साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे कलम 2 व 3 प्रमाने कारवाई करण्यात आली आहे यापुढेही कुणी रस्त्यावर विनाकारण विनामास्क फिरण्यास आपल्या कामाच्या ठिकाणी मास्क चा वापर न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स पो नि जनार्दन सोनवणे यांनी सांगितले.