साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 जुलै 2020
श्रीरामपूर | कोरोना महामारीत सर्व सामान्य जनता एकीकडे उपासमारीत जीवन जगत असतांना दुसरीकडे माञ महावितरण कंपनीने पहिल्यादाच चार महिन्याच्या सरसगट युनिट बिलात पाच ते पंधरा हजार रुपये 'दाम दुप्पट' रकमेच्या बिलाची आकारणी करुन पाठविलेली बिले भरण्यास पैसे आणायचे कोठून अशा प्रश्नानाने सामान्य ग्राहकापूढे पडला आहे.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत जगायचं कसं.! त्यात महावितरणचा दुष्काळात तेरावा महिन्याने तर वीज ग्राहक अधिकच"हवालदिल झाला आहे.
सन—१९९९ सालातील भीषण दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेवून दुष्काळाने मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांच्या वीज पंपाना ५०% वीज बिलात तब्बल तीन वर्ष सवलत तत्कालीन मुळा —प्रवरा वीज संस्थेनेने दिली होती. अगदी त्याच धर्तीवर शासनाने सध्याच्या कठीण, भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने संपृष्टात असलेल्या मुळा-प्रवरा वीज संस्थेचे अनुकरण करुन मार्च २०२० ते जुलै. २०२० पर्यतची सरसगट बिले माफ करुन जनतेला दिलासा द्यावा डावरे यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे.
या निवेदनावर लक्ष्मण शिंदे,सतीश व्यास,फकीर मोहमंद आत्तार,किशोर महापूरे,जितेंद्र वर्मा, रविद्र कोळपकर, बाबासाहेब बोरुडे,राजेंद्र मिसाळ,गोरख मगर,मोहनराव खानवेलकर, महेष कुलकर्णी, सुनिल सांळूके, साहेबराव वाघ, आदीसह बेलापूर, बेलापूर खुर्द,उक्कलगाव,पढेगाव,मांलुजा,केसापूर,आंबी,चांदेगावसह प्रवरा काठावरील तीस गावातील वीज ग्राहकांच्या सह्या आहेत.