साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 जुलै 2020
श्रीरामपूर | येथील संत लुक हाॅस्पीटलमध्ये शहरातील जे कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत आहेत, त्याबाबत बुधवारी (दि.15) नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या पुढाकाराने तहसिलदार प्रशांत पाटिल यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, सेवाभावी संस्थांनीही याकामी प्रशासनास मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.
या प्रसंगी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, राजेश अलघ, राजेंद्र पवार, रवी पाटील, रईस जागीरदार, अल्तमश पटेल आदि मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी, कोरोना बाधित रुग्णांवर जे उपचार सुरु आहेत त्या सर्व उपचारांची व रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सुविधांची पुरविण्यात सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी प्रशासनास आवश्यक ती मदत देण्यासंबंधी सकारात्मक दर्शविली. सेवाभावी संस्थांनिही याकामी प्रशासनास मदत करण्यासाठी पुढे यावे, असे अवाहन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.