![]() |
छाया : भरत थोरात |
साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 जुलै 2020
श्रीरामपूर | कृषी सप्ताह दिनानिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात दुध दरवाढीच्या मागणीसाठी सर्वच तहसील कार्यालयावर आंदोलन केले जात आहे. शेतकर्यांच्या दुधाला किमान ३५ दराने भाव मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने श्रीरामपूर तलसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
श्रीरामपूर तहसील कार्यालयासमोर पांडुरंगाच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घालून शेतकर्यांच्या दुधाला किमान ३५ दराप्रमाणे भाव मिळावा या मागणीसाठी रा.स.पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या तिघाडी सरकारने शेतकर्यांच्या प्रति लिटर दुधाला १० रूपये अनुदान स्वरुपात देवून या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना 'हे पांडुरंगा तु सद्दबुध्दी दे रे बाबा', असे साकडे पाडूरंगा चरणी घालण्यात आलं. या वेळी कोरोना संदर्भातील सर्वच कायदेशीर नियमाचे पालन करत आंदोलन करण्यात आले तरी आपल्या स्तरावर शेतकऱ्याचे दुध दराबाबतच सरकाराने लक्ष्य घालून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली श्रीरामपूरचे नायब तहसीलदार गुजांळ यांनी शेतकर्याचे निवेदन स्वीकारले. यावेळी रासपचे जिल्हा सचिव डॉ सुनिल चिंधे, रासपचे श्रीरामपूर तालूकाध्यक्ष दत्तात्रय कचरे, मनोज देवकाते उक्कलगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक बापूसाहेब चिंधे, सतिश देठे, मंजाबापू खेमनर,अक्षय चक्रनारायण, गणेश हाळनोर, बाळासाहेब माकोणे, आदी गावचे कार्यकर्ते उपस्थित होते.