साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 जुलै 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील किराणा दुकान चालक सुहास बाबुराव फुलपगार ( रा. उक्कलगाव ) हे त्यांच्या दुकानात असताना विनानंबरच्या दुचाकीवर दोन जण तरूण आले. त्यातील एक जण खाली उतरला व दुकानचालकाला तादूंळाची त्यांनी मागणी केली दुकान चालक वजनकाट्यावर तादूंळ मोजून देत असताना तेवढ्यात क्षणातच आरोपीने खिशातून मोबाईल हॅण्डसेट काढून चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि.7) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
मोबाईलची किमंत २१ हजार रूपये इतकी आहे. आरोपी हे बेलापूर दिशेने धुमस्टाईल पसार झाले सुहास फुलपगार या तरुणाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द भा.दि.कलम ३९२ / ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पोनि श्रीहरि बहिरट यांनी घटनास्थळी भेट दिली सपोनि समाधान पाटील हे पुढील तपास करत आहे श्रीरामपूरसह, ग्रामिण भागात मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.
Tags
क्राईम