उदघाटन दिवशी प्रथम ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यास चावी सुपुर्द करताना संचालक
______________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 जुलै 2020
घोडेगाव (दादा दरंदले) नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे आयशयर ट्रॅक्टर कंपनीचे शिवराज ट्रॅकटर शोरूमचे उदघाटन संपन्न झाले. घोडेगाव सारख्या ठिकाणी अद्ययावत असे ट्रॅक्टरचे शोरूम सुरू झाल्याने शेतकरी वर्गास आपल्या परिसरात ट्रॅक्टर्स खरेदी करता येणार आहे .
घोडेगाव येथील प्रगतशील शेतकरी लहू आढाव यांचे चिरंजीव इंजी. गणेश आढाव व इंजी.निलेश आढाव यांनी घोडेगाव येथे ट्रॅक्टरचे शोरूम सुरू केले असून मंगळवार दिनांक ७ जुलै रोजी कृष्णा महाराज नागे व नामदेव महाराज कोरडे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले , राज्याचे जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
ट्रॅक्टर विक्रीसह ,सर्व्हिस व सर्व स्पेअर पार्ट देखील या ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे संचालक इंजी.गणेश आढाव यांनी सांगितले. कांगोनी येथील शेतकरी संभाजी फाटके यांनी पहिल्याच दिवशी ट्रॅक्टर खरेदी केले , उदघाटन झाल्यावर अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या अनेकांनी आपल्या परिसरात ट्रॅक्टर्स शोरूम सुरू झाल्याने आनंद व्यक्त केला .