साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 जुलै 2020
घोडेगाव (दादा दरंदले) नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ७३ वर्ष व्यक्तीने खाजगी प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी केली होती त्याचा अहवाल आज शुक्रवार २४ जुलै रोजी खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात कोरोना बाधित असल्याचे आढळून आले, असे स्थानिक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. आता घोडेगाव येथे कोरोना बाधित रुग्णाची संख्या ही दोन झाली आहे.