साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 जुलै 2020
अहमदनगर | आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये एकूण २५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात नगर शहरातील १४, राहुरी तालुका ०४, बीड जिल्हा-०१, पाथर्डी तालुका ०१, कोपरगाव ०३, राहाता तालुका ०१ आणि श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बाधित आढळले आहेत. राहुरी तालुक्यातील केसापूर येथे एकाच कुटुंबातील तिघे कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील एका युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नगर शहरातील तोफखाना भागातील १०, ढवणवस्ती येथील ०२ केडगाव येथील ०१ आणि भूषणनगर येथे ०१ रुग्ण आढळून आला आहे. याशिवाय, राहुरी तालुक्यातील केसापूर येथे ०३, वांबोरी येथे ०१ रुग्ण आढळला आहे. शिरुरकासार (जि. बीड) येथील एक व्यक्ती बाधित आढळला आहे. पाथर्डी मधील वामनभाऊनगर येथे एक बाधित रुग्ण, कोपरगाव येथील श्रीकृष्णनगर येथील ०१ आणि ओमनगर येथील ०२, शिर्डी (ता. राहाता) येथील ०१, आणि खैरे निमगाव (ता. श्रीरामपूर) येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटीव आढळून आला आहे.