पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी संगनमत केल्याचा ठपका
साईकिरण टाइम्स ब्युरो, 9जून 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापुर येथील जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात आलेले मराठी शाळेचे काम निकृष्ट झाले असल्याचे आरोप भेर्डापुर ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत असे की, जिल्हा परिषदेच्या मार्फत जिल्हा वार्षिक योजना २०१९/२० अंतर्गत भेर्डापुर येथील सुमारे आठ लाख रुपये खर्चाचे मराठी शाळेचे बांधकाम घेण्यात आले होते. या करिता ई निविदेचा वापर करण्यात आला आणि त्रिमूर्ती मजूर सहकारी संस्था बेलापूर यांना सदरचे काम देण्यात आले.
शाळेचे बांधकाम पूर्ण होऊन फक्त तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला असून सदर कामाचे उद्घाटन सुद्धा झाले नाही त्यातच झालेल्या बांधकामाची दयनीय अवस्था झाली आहे.
काही ठिकाणी छताला तडे गेले आहे तर काही ठिकाणी प्लस्टर पडून भीतीला तडे गेले आहेत . त्यामुळे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी संगनमत करुन या लोकहिताच्या कामात भ्रष्टाचार केल्या असल्याची तक्रार भेर्डापुर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
दोषींवर त्वरित कार्यवाही कारवाई करावी अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे केला आहे.
निवेदनावर तालुका युवक काँग्रेसचे सचिव प्रताप कवडे, उपसरपंच बाबासाहेब पवार, सुनील गायकवाड, बाळासाहेब धनवटे, प्रदीप मोहिते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अड. यशवंत उंडे, उपाध्यक्ष संदीप कसबे, लक्ष्मण कसबे, सतीश लोंढे, काका लष्करे आदींच्या सह्या आहेत.