Shrirampur : गोंधवनी रस्तालगतच्या पुलाखाली अवघ्या 12 तासात नगरपालिकेडून स्वच्छता ; 'साईकिरण टाइम्स'च्या वृत्ताची दखल

साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 जून 2020
श्रीरामपूर | प्रतिनिधी | शहरातील  गोंधवणी रस्त्यालगत पाटाच्या पुलाखालील साचलेल्या घाण पाण्यामध्ये काही  दिवसांपूर्वी रात्री अंधाराचा फायदा घेत मेलेली जनावरे टाकल्याने ते पाण्यात पूर्णत: सडून परीसरात दुर्गंधी पसरली होती ; याबाबत 'साईकिरण टाइम्स' मध्ये 'गोंधवनी रोड दुर्गंधीच्या विळख्यात, नगरपालिकेचे दुर्लक्ष' या मथळ्याखाली वृत्त प्रसारीत करण्यात आले होते. सोशल मीडियावर हे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या वृत्ताची नगरपरिषद प्रशासन व नगराध्यक्षांनी  तात्काळ दखल घेतली. या ठिकाणी साफसफाई करून अवघ्या 12 तासाच्या आत नागरिकांच्या समस्या दूर झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

                येथील गोंधवणी रस्त्यालगत पाटाच्या पुलाखाली मृत्य जनावरांचे कुजलेले अवशेष, घाण यामुळे मागील आठ दिवसांपूर्वी दुर्गंधी पसरली होती. परिसरातील नागरिक  त्रस्त झाले होते. आज्ञातांनी  याठिकाणी पाटाच्या पुलाखाली साचलेल्या पाण्यात मेलेली जनावरे आणून टाकली होती. ती सडल्याने संपूर्ण परीसर दुर्गधीमय झाला होता. येता-जाता कचरा गाड्यावाल्यांना याबाबत सांगुनही ते ऐकत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. संबधितांना फोन करुनही त्याची दखल घेतली जात  नव्हती. दुर्गंधीचा त्रास तर वाढतच चालला होता. 

                'साईकिरण टाइम्स' मध्ये दि. 30 मे रोजी याबाबत वृत्त प्रसारीत करण्यात आले होते. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी सकाळी नगरपालिका प्रशासनाचा ताफाच या ठिकाणी  पोहचला.  नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,  मुख्याधिकारी, संबंधित विभागाचे  अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी त्वरित दखल  घेत साफसफाई करून घेतली. केवळ १२ तासाच्या आत परीसरातील  नागरीकांच्या समस्या दुर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

इतर काही ठिकाणी मात्र वर्षानूवर्ष नागरी समस्यांची दखल घेतली जात नाही,नागरी समस्यांकरीता लोकांना धरणे, आंदोलने, मोर्चे, उपोषणे करणेकामी भाग पाडले जाते, इथं मात्र त्याविरुद्ध स्तिथी आहे, इथं केवळ एक व्हॅटसअॅप मॅसेजची इतकी तात्काळ दखल घेणं हे केवळ नगराध्यक्षा अनुराधाताईकडून  होऊ शकतं. परीसरातील नागरीक ताईंच्या या सक्षमी कार्याला मनस्वी सलाम करीत आहेत. 
                         - शौकत शेख, 
                   समता फाऊंडेशन, श्रीरामपूर

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post