आदर्शगाव मोरयाचिंचोरे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपन करतांना 21 गावचे सरपंच स्मिता आण्णासाहेब आंबडे कारेगाव
_______________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 जून 2020
घोडेगाव (दादा दरंदले) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जुन रोजी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई व आर्ट ऑफ लिव्हिंग नगर, यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्शगाव मोरयाचिंचोरे येथे प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेनुसार नेवासा तालुक्यातील 21 गावांच्या सरपंचाची यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्त गाव व ताण ,तणाव मुक्त या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली.
यामध्ये पद्माकर कुलकर्णी प्रशिक्षक आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी उपस्थिताना विविध प्रकारचे योगासने, योग,ध्यान आदीचे महत्व समजावून सांगितले. आजच्या धकाधकीच्या जीवनात ग्रामीण संस्कृतीचे जतन व संवर्धन करावयाचे असेल तर व्यसनमुक्त गाव व ताण ,तणाव मुक्त गाव ही संकल्पना किती महत्वाची आहे हे सांगितले. उपस्थित सर्वांशी लोकसहभागाबाबत चर्चा झाली. तसेच प्रत्येक गावात यावर्षी पावसाळ्यात पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करत वृक्षारोपन करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आदर्शगाव मोरयाचिंचोरे येथील टेकडीवर 21 गावांचे सरपंच यांचे उपस्थीतीत वृक्षारोपन करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शिंगवेतुकाई, लोहोगाव,मांडेमोरगव्हाण, राजेगाव, वांजोळी,नागापुर, लोहारवाडी, नजीक चिंचोली, नवीन चांदगाव, बाभूळखेडा, मोरयाचिंचोरे, लांडेवाडी, गणेशवाडी, बेल्हेकरवाडी, वंजारवाडी, मुरमे, खलालपिंप्री, मडकी आदी गावचे सरपंच यासह ऍड अण्णासाहेब आंबाडे, शिवाजीराव पाठक, भीमाशंकर वरखडे,भरत गर्जे, पद्माकर कुलकर्णी आर्ट ऑफ लिव्हिंग ,ऍड सुनील गडाख,अशोक लाटे ,रोहन भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक लाटे यांनी केले तर स्वागत व आभार बाबासाहेब दराडे समन्वयक आदर्शगाव मोरयाचिंचोरे यांनी मानले.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे संयुक्त विद्यमाने मा प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नजीक चिंचोली गावात व्यसनमुक्त गाव व ताण,तणाव मुक्त गाव ही अभिनव संकल्पना राबवणार. यात गावातील महिलांचा सक्रिय सहभाग घेणार आहे.
- सौ दीपाली आदिनाथ बारहाते सरपंच, मांडेमोरगव्हाण.