साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 जून 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) श्रीरामपूर बेलापूर रस्त्यालगत राहणाऱ्या अरुण नवनाथ धनवटे (वय २९ ) या युवकाने राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.18) दुपारी घडली.
आत्महत्येचे निश्चित कारण समजु शकले नाही. नवनाथ ढोल पार्टी नावाचे त्यांचे ढोल पथक आहे. बऱ्याच दिवसापासून त्यांच्या हाताला कामच नव्हते. सकाळी जेवण करुन अरुण नेहमी प्रमाणे खोलीत गेला घरच्यांना वाटले तो झोपला असेल परंतु एक वाजण्याच्या सुमारास खोलीत डोकावले असता त्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. या घटने बाबत तातडीने बेलापूर पोलीसांना खबर देण्यात आली बेलापूर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली बेलापूर पोलीस स्टेशनचे राशीनकर रामेश्वर ढोकणे निखील तमनर पोपट भोईटे आदिंनी तातडीने पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. बेलापूर येथील स्मशानभुमीत त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.
Tags
ताज्या घडामोडी