Ghodegaon : माऊली सेवा प्रतिष्ठाणला फळांचे वाटप करत वाढदिवस साजरा ; श्री आप्पासाहेब शिंदे मित्रमंडळाचा उपक्रम

साईकिरण टाइम्स ब्युरो, 2 जून 2020
घोडेगाव (दादा दरंदले)  सध्याच्या काळात वाढदिवसाचं फॅड दिवसेंदिवस वाढतंच चाललेलं आहे. त्यामुळे वाढदिवस म्हटलं की मोठ-मोठ्या जाहिराती नि सेलिब्रेशन हे नित्याचं ठरलेलंच. त्यासाठी मुक्तहस्ते प्रचंड खर्चही सर्रास केला जातो. मात्र जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत गेल्या 3 वर्षांपासून आप्पासाहेब शिंदे मित्रमंडळाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सामुदायिक अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला जातो. मात्र वाढदिवसासाठी पैशाची उधळपट्टी न करता समाज  ऋणातुन उतराई व्हावी या उद्देशाने आप्पासाहेब शिंदे मित्रमंडळाने या वर्षी डॉ.सुचेता व डॉ. संजय धामणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या माऊली सेवा प्रतिष्ठानच्या मनगावच्या प्रकल्पात आगळा-वेगळा वाढदिवस साजरा केला.


           1 जून 2020 रोजी  जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने आप्पासाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने ज्यांचे मन व घर हरवलेले आहे अशा मनगाव आश्रमातील  पिडीत व मनोरुग्ण स्त्रीया आणि त्यांच्या लहान-लहान मुलांना  फळांचे वाटप करून संपन्न झाला. यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव आप्पासाहेब शिंदे , शिक्षक सेनेचे सचिव उद्धवराव सोनवणे,सोसायटी संचालक महेंद्र हिंगे, भाऊसाहेब जिवडे,संजय रोकडे, सिकंदर सय्यद बाळू साबळे, बाळासाहेब कोतकर, श्री लंगोटे सर, म्‍हस्‍के योगिता, असाल अंजली व डमरे मॅडम आदी उपस्थित होते. त्यावेळी माऊली सेवा प्रतिष्ठान मनगाव चे संचालक डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे या दांपत्याना मित्रमंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


गेल्या काही वर्षांपासून 1जून रोजी समाज ऋणातून उतराई होण्यासाठी हार-तुरे व सत्काराला फाटा देऊन वाढदिवस साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची रोपे  देऊन तर कधी पुस्तके भेट देऊन एक आगळा-वेगळा उपक्रम राबवण्याचा मंडळाचा नेहमी प्रयत्न असतो.
                      --- श्री.आप्पासाहेब शिंदे
              (सचिव,माध्यमिक शिक्षक संघटना)


 जून म्हणजे सर्रास अनेकांचा वाढदिवस असतो.असा जम्बो वाढदिवस साजरा करताना निराधार नि बहिष्कृत घटकालाही त्यात सहभागी करून घेतल्याचा मोठा आनंद असून डॉ.धामणे दांपत्या सारख्या देवदूताच्या कार्याला सलाम.
                    ---श्री उद्धवराव सोनवणे
                          (सचिव,शिक्षक सेना)

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post