cyber : फेसबुक अकाऊंट हॅक करुन पैसे उकळण्याचा प्रयत्न ; सायबर शाखेत तक्रार दाखल

साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 जून 2020
बेलापूर  ( प्रतिनिधी ) फेसबुक अकाऊंट हॅक  करुन मोबाईल धारकाच्या नातेवाईकाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न  थोडक्यात फसला असुन संबधीत मोबाईल धाराकाने सायबर शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे ही घटना घडली आहे.     

      याबाबत सविस्तर हकीकत अशी की,  बेलापूर येथील अमोल विठ्ठल गाडे यांचे मोबाईल  अज्ञात व्यक्तीने हॅक करुन त्या मोबाईल मधील सर्व व्यक्तीचे मोबाईल नंबर  मिळवुन त्यांना मेसेज केले की मला पैशाची अंत्यंत गरज असुन तातडीने 'फोन पे'वर या खात्यावर पैसे पाठविण्याची विनंती केली. मात्र,  हे संदेश पाठविताना पाठविणाऱ्या व्यक्तीने हिंदीतुन संदेश पाठविला, त्यामुळे, अमोल गाडे यांच्या मेव्हण्याला संशय आला त्यांनी तातडीने अमोलला फोन करुन विचारणा करताच मी पैसे मागीतलेच नाही, असे अमोलने सांगताच त्याच्या मेव्हण्याने  मोबाईलचा स्क्रीन शाँट काढून पाठविला. त्याच  दरम्यान अमोलला एका व्यापाऱ्याचाही फोन आला अन मग अनेक मित्राचे फोन सुरु झाले की, तुला अचानक पैशाची काय गरज पडली. या प्रश्नामुळे अमोल गोंधळून गेला त्याने तातडीने गुन्हा अन्वेषन शाखेचे रविंद्र कर्डीले मनोज गोसावी यांना ही घटना सांगीतली. त्यांनी ताताडीने व्हाँटसअप वर संदेश पाठविण्यास सांगीतला. अशाच प्रकारे गावातील चार-पाच जणाचे मोबाईल हॅक करण्याच्या घटना घडल्या असुन, अमोल गाडे याने अहमदनगर येथील सायबर शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली असुन गाडे यांच्या बरोबर घडलेली घटना आणखी कुणाच्याही बाबतीत घडू शकते. त्यामुळे, कुणीही विनाकारण चौकशी केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करु नये, असे अवाहन बेलापूर पोलीस स्टेशनचे रामेश्वर ढोकणे यांनी केले आहे.  

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post