सात्रळ | बाबासाहेब वाघचौरे | आज राहुरी शहरात महाराष्ट्र राज्य नाभिक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान आणा बिडवे, राज्य अध्यक्ष दत्ता शेठ आनारसे यांच्या सूचनेनुसार आणि उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष किरणराव बिडवे याच्या मार्गदर्शनाखाली राहूरी शहरात सलुन दुकाने शासनाने बंद केल्याच्या निषेध करण्यात आला. यावेळी सरकारने सलुन व्यवसायिकास दरमहा 10 हजार रुपये अनुदान द्यावे, विज बिल माफ करावे, दुकान भाडे माफ करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी मार्केट कमिटीचे चेअरमन अरुण साहेब तनपुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे, भाजपचे आण्णा पा शेटे, राष्ट्रवादीचे संतोष आघाव, आर पी आय (आठवले गट)चे विलास साळवे, समता परिषदेचे मच्छिंद्र गुलदगड, व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख, माजी नगराध्यक्ष रावसाहेब तनपुरे, माजी नगराध्यक्ष दिलीप चौधरी, नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उंडे आदींनी नाभिक समाजाच्या आंदोलनास सहानुभूती व्यक्त केली व पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष भाऊसाहेब बिडवे सरचिटणीस कल्याण राऊत, तालुका अध्यक्ष सुजित कोरडे, तालुका सलुन अध्यक्ष महेश कोरडे, राहुरी शहर अध्यक्ष प्रसाद कोरडे, उपशहर अध्यक्ष किशोर दुधाडे, उपतालुका अध्यक्ष मंगेश दुधाडे, सलुन शहर अध्यक्ष सुनील कोरडे, पप्पू कोरडे मयुर राधाकिसन दुधाडे,अशोक पवळे,लक्ष्मीकांत कोरडे,प्रविण कोरडे,उमेश कोरडे,भुषण मदने,लखन कदम,अभिजित कदम,राजेंद्र कोरडे,ऋषिकेश कोरडे,प्रकाश राऊत आदि नाभिक महामंडळाचे, सलुन आसोशियनचे,ब्युटी पार्लर आसोशियचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.