श्रीरामपूर | हिंद सेवा मंडळाच्या भि.रा.खटोड कन्या विद्यालयात शिक्षण महर्षी स्व. दादा जोशी याच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी माजी आमदार भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर कदम, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, भाऊसाहेब कांबळे, संजय जोशी, रविद्र गुलाटी, प्रसाद जोशी, संजय छल्लारे, अनिता जोशी, अशोक उपाध्ये,राजेश अलघ आदि. (छाया-अनिल पांडे)
________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 जून 2020
श्रीरामपूर ( वार्ताहर ) कोवीड १९ (करोना व्हायरस) पार्श्वभूमीवर शिक्षण महर्षी स्व. दादा जोशी याच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिरात एकाच दिवसात तब्बल २०१ पिशवी रक्त संकलन झाल्याने उदिद्ष्टाच्या दुप्पट यश संयोजकांना मिळाले. राष्ट्रप्रेम रुणांचा उत्साह आणि स्व. दादा जोशी यांचेप्रती असलली श्रीरामपूरकरांची निष्ठा या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.
येथील हिंद सेवा मंडळाच्या भि.रा.खटोड कन्या विद्यालयात शहरातील विविध तरुण मंडळाच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर आयोजति करण्यात आले होते. मास्कचा वापर, प्रवेशद्वारातच सॅनिटायझर फवारणी आणि सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळत काल दिवसभर रक्तदात्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नगर येथील जनकल्याण रक्तपेढीच्या अमुल्य सहकार्यातून हे कार्य पार पडले. उपलब्ध कॉट आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता अनेक रक्तदात्यांनी पत पाठविण्यात आले असे असले तरी १११ पिशवी संकलनाचे उद्दिष्ट संध्याकाळपर्यंत २०१ पिशवीपर्यंत पोहोचल्याने संयोजकंना समाधान वाटले.
रक्तदात्यांना नाश्त्याला फळे तसेच प्रमाणपत्र, मास्क आणि सॅनिटायझरची बाटली मोफत वाटण्यात आली. ज्येष्ठ मार्गदर्शक व भाजपा नेते हेरंब आवटी, अशोक उद्योग समुहाचे सुत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे, साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, नगरायक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, विजय शिंदे, कामगार नेते अविनाश आपटे, नगरसेवक राजेश अलग, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, माजी मानद सचिव सुनिल रामदासी, माजी उपाध्यक्ष रणजति श्रीगोड, मोहन कुकरेजा, विद्यमान उपाध्यक्ष अशोक षीरसागर, सतिष बुब, दिलीप शहा, अनिल देशपांडे, राजेंद्र जोशी आदि मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन व स्व.दादांच्या प्रतिमेस अभिवान करुन रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
स्वागत हिंद सेवा मंडळाचे विद्यमान मानद सचिव संजय जोशी यांनी तर प्रास्ताविक संयोजक समिती प्रमुख रवींद्र गुलाटी यानी केले. यावेळी हेरंब आवटी, माजी आ.भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर कदम, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यानी प्रातिनिधीक मनोगत व शिबिरास शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांचा संयोजन समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस अविनाश आदिक, पत्रकार रमेश कोठारी, प्रदिप आहेर, सुनिल नवले, गणेश आंबिलवदे, पद्माकर शिंपी, अशोक गाडेकर, अनिल पांडे, तुळशीराम गाडेकर, मिलिंद साळवे, सुकदेव सुकळे यांनी शिबीरास सदिच्छा भेट दिली.
यावेळी गोरक्षनाथ पा.मुसमाडे, मच्छिंद्र पा. कदम, डॉ.विजय तांबे, डॉ.सतिष कोठारी, डॉ. रवींद्र कुटे, डॉ.पारस कोठारी, डॉ.वसंत जमदाडे, अॅड.अनंत फडणीस, सुमतीलाल कोठारी, सुजित बेडेकर, प्रसन्न गटणे, उदय खर्डे, प्रकाश चित्ते, बबन मुये, अनिल मुथा, कमलजित बतरा, डॉ. वंदना मुरकुटे, डॉ. नवनीत जोशी, डॉ.सलीम शेख, मुनन पठाण, सुनिल बोलके, चंद्रकांत सगम, रमेश वैद्य, दिपक कुèहाडे, भगवान वलेशा, पुरुषोत्तम मुळे, विजय नगरकर, माणिक जाधव, अमोल कोलते, अरुण धर्माधिकारी, सुधीर वायqखडे, शम्मीकुमार गुलाटी, प्रविण गुलाटी, केमिस्ट असो.चे शशांक रासकर, व सहकारी. स्वामी विवेकानंद मित्र मंडळाचे दत्तात्रय साबळे, जिजामाता मंडळाचे संजय छल्लारे, जत मातादी मंडळ, श्रीराम तरुण मंडळ, लोकहित मंडळाचे देवीदास चव्हाण, ज्ञानेश्वर माऊली पतसंस्थेचे संतोष अभंग, माली प्रतिष्ठानचे अनिल भनगडे, दिलीप विळस्कर, राजेंद्र सोनवणे, विजय शेलार, बंटी गुप्ता, महाराज कंत्रोड, रक्तदाने व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर भव्य क्क्तदान शिबीर यशस्वीतेसाठी भि.रा. खटोड द्यिालयाचे चेअरमन अशोक उपाध्ये, मर्चंण्टचे संचालक नितीन ललवाणी, सुशिल गांधी, विजय सेवक, महेंद्र दंडवते, प्रविण भंडारी, उदय बधे, शशिकांत भुतडा, अनिता जोशी, वैशाली जोशी, सपना उपाध्ये, अलका सेवक, प्राचार्या चित्रा कडू, सुजाता मालपाठक, विद्या कुलकर्णी, रंजना किरकिर, अधिक जोशी, कल्याण लकडे, सचिन मुळे, नवनाथ जंगले, रत्नमाला गाडेकर, अवधूत कुलकर्णी, भरत शेंगाळ, पंजाबराव भोसले, सुवेंद्र पाटील, भि.का. कांबळे, दत्तात्रय कांबळे, तागड मॅडम, दिनेश दिक्षित, महेश डावरे, वैभव गायकवाड आqदसह qहद सेवा मंडळाच्या शहरातील सर्व शाळांचे अधिकारी, पदाधिकारी तसेच शिक्षक सेवकवृंद, संयोजक समितीमधील शहरातील सर्व मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष, असस्य व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.समारोप करतांना जनकल्याण रक्तपेठीचे डॉ.वसंतराव झेंडे, डॉ. पारनेरकर यांचा तसेच त्यांच्या सहकार्याचा सत्कार करण्यात आला.अशोक उपाध्ये यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसचलन प्रा.सतिष म्हसे व प्रा.आदिनाथ जोशी यांनी केले.