साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 जून 2020
सोनई | दादा दरंदले |ग्रामीण व शहरी भागात खऱ्या अर्थाने आरोग्यदूत म्हणून काम करणाऱ्या राज्यातील आशा सेविकांची मानधन वाढीबाबत अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित होती. कोरोना विरुद्धच्या लढ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या राज्यातील सर्व आशा सेविकांना नुकत्याच राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्या निर्णयानुसार जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष मानधनाचा लाभ आशा सेविकांना मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आशा सेविकांच्या मागणीचा प्रश्न मार्गी लागल्याने सर्व आशा सेविका ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून समाधान व्यक्त करीत आहे.
या निर्णयातून सर्व आशा सेविकांना मदत होणार आहे ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची नेवासा तालुक्यातील आशा सेविकांनी भेट घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला.
यावेळी ना.गडाख म्हणाले की, राज्यावर कोरोनाचे भीषण संकटात आपण सर्व आशा सेविका व आशा गटप्रवर्तकांनी जीवाची पर्वा न करता कोरोना विरुद्धच्या लढाईत उत्तम कार्य केले.
आजही या कोरोनावर मात करण्यासाठी कार्यरत आहे या सर्व बाबींचा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करून मोठा दिलासा दिला आहे.यापुढेही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय हे सरकार घेत राहील अशी हमी दिली.
सर्व आशा सेविकांनी कोरोना काळात केलेल्या अतुलनीय कामाबद्दल अभिनंदन केले. सत्कार प्रसंगी नेवासा तालुका आशा सेविका व गट प्रवर्तक यांच्या वतीने रोहिणी कुलट यांनी आपले मनोगत व्यक्त करतांनी अनेक वर्षांच्या मानधन वाढीबाबत निर्णय घेतल्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले. ठाकरे सरकारने मानधन वाढीच्या निर्णय बाबत समाधान व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी नेवासा तालुक्यातील अनेक आशा सेविका व आशा गट प्रवर्तक उपस्थित होत्या.
असे वाढले मानधन....
1)आशा सेविका प्रति महिना वाढ 2000 हजार रुपये
2)आशा गटप्रवर्तक प्रति महिना वाढ 3000
महाराष्ट्रात सध्या 71 हजार सेविका कार्यरत असून त्यांच्या मानधन वाढीसाठी 157 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.