साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 जून 2020
घोडेगाव (दादा दरंदले) नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील रहिवासी जिवंत आणि रांगड्या अभिनयातून अनेक वगनाट्ये अजरामर करणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत,वगनाट्यकार विठ्ठल गाडेकर (घोडेगावकर) (वय 65) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
आपला गाव परिवार सोडून वर्षाचे 8 महिने महाराष्ट्रभर फिरत असताना वगनाट्यमध्ये नायक,खलनायक अशा एकणानेक प्रकारचे पात्र साकारत महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मनोरंजन हे तमाशाचा माध्यमातून त्यांनी केले. हरिभाऊ बडे नगरकर,भिका-भिमा सांगावीकर,अक्काताई कराडकर,नंदकुमार तांबे शिरोलीकर,अमन तांबे पुणेकर या तमाशा मध्ये काम करत लोकप्रिय अशा 'रंगात रंगला पुढारी' ,'घुंगरान कापला गळा', 'पुढाऱ्यांन हेरली बाई', 'मला फाशी द्या', 'तालुक्याची किल्ली हातातून गेली' या वगनाट्यामधे काम करत प्रसिध्दीच्या झोतात आले होते.
त्यांच्या निधनाने परिसरातील कलाप्रेमी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे शेवट पर्यंत धडपड करणाऱ्या या वृद्ध कलावंतांला शासनाचे कोणत्याही प्रकारचे मानधन मिळाले नाही हीच मोठी मनात खंत आहे.