साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 जून 2020
घोडेगाव (दादा दरंदले) नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात अडीच महिन्यापासून बंद असलेला कांद्याचा लिलाव उद्यापासून (दि.०६ )सुरू होणार आहे, अशी माहिती सचिव देवदत्त पालवे यांनी दिली.
लॉकडाऊन पूर्वी येथे आठवड्यातील तीन दिवस लिलाव होत होता परंतु कोरोना (covid-19) या महाभयंकर माहामारी मुळे अडीच महिन्यांपासून लिलाव बंद असल्याने कांदा ठेवण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता पावसाचे वातावरण सुरू झाल्याने सर्वच शेतकरी हवालदिल झाले होते मात्र शेतकऱ्यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे लिलाव सुरू करण्याबाबतची मागणी केली होती.
मंत्री शंकरराव गडाख यांच्या सूचनेनंतर बाजार समितीच्या संचालक मंडळाने सोशल डिस्टंसिंग सह सर्व बाबींचा विचार करून शनिवारी व बुधवारी सकाळी 8 ते 12 या वेळेत लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. लिलावात एका शेतकऱ्यास 25 गोण्या कांदा आणता येणार असून नोंदणी केलेल्या नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना या लिलावात भाग घेता येणार आहे असेही मार्केटचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले.
मंत्री साहेब यांच्या सूचनेनुसार व शेतकऱ्यांनीही कमिटीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत कांदा विक्रीसाठी आणावा व आजपर्यंत जसे सहकार्य केले त्याच पद्धतीने पुढील काळात सहकार्य करावे कोरोना रोगापासून कसे दूर राहता येईल याची काळजी घ्यावी व व्यापारी वर्गाला सहकार्य करावे.
-श्री शरद नारायण सोनवणे,
कांदा आडतदार, घोडेगाव उपबजार.