साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 जून 2020
संगमनेर | तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देत असलेल्या साईसमर्पण फाऊंडेशनच्या वतीने एक हजार हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना मोफत किराणा किटचे वाटप गेल्या तीन महिन्यांपासून करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ. संदीप अरगडे यांनी दिली.सदर उपक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष संदीप सातपुते, उपाध्यक्ष आशिष ताजणे, सचिव आप्पासाहेब चत्तर, सहसचिव दिगंबर नालकर, संचालक योगेश लामखडे व राजेंद्र खर्डे या सर्व टीमने अपार मेहनतीने किराणा किट गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.
या उपक्रमाचा समारोप नुकताच सांदीपनी बालिका आश्रम, इंदिरानगर याठिकाणी राष्ट्रपती पारितोषिक विजेते सोमनाथ कळसकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सदर बालिका आश्रमालाही १२ किराणा किट देण्यात आल्या. सदर उपक्रमात योगदान देणारे दाते डॉ. सतीशजी वर्पे, डॉ. प्रवीणकुमार पानसरे, गोरख कुटे, विक्रीकर निरीक्षक निलेश गायकवाड, ग्रामपंचायत देवगाव ,डॉ निलेश देशमुख,आप्पासाहेब चत्तर ,डॉ. संदीप अरगडे, आशिष शेठ ताजणे,संदीप सातपुते सर, दिगंबर नालकर, लिला भाऊ कोटकर,अनिल रोहम, प्रा. संदीप आरोटे, योगेश लामखडेम , डॉ. विकास करंजेकर , डॉ. ताज तांबोळी,डॉ.निलेश पोटे, भाऊसाहेब श्रीपद चत्तर, साहेबराव अभंग, संदिप कानवडे- मुंबई , अजय पावसे (कामगार पोलीस पाटील देवगाव) ,अनिल एकनाथ कोटक, सुनीलभाऊ शिंदे,भारत नवले, अण्णासाहेब कोटकर,गणेश तांबे,सोमेश वाघमारे ,सोमेश कोटकर,अशोकराव सातपुते ,सरुनाथ साबळे, जिवन जाधव सर ,अनिलजी जाधव ,आशिष पाटील, अनिल ताजणे,योगेश ताजणे, सौ.उषाताई भाऊसाहेब दिघे,संजय गांडोळे,राजेंद्र खर्डे,खंडू लामखडे यांचा योगदानातून हे मोठे काम उभं राहिले.लाॅकडाऊनच्या अतिशय प्रतिकुल कालखंडामध्ये साई समर्पण फाउंडेशनने केलेल्या या समाजसेवी कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.