साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 मे 2020
सात्रळ | बाबासाहेब वाघचौरे | मुळा -प्रवरा इलेक्ट्रिक को.आॅप सोसायटी लिमिटेड, श्रीरामपुर यांचे सौजन्याने कोविड -१९ च्या लाॅकडाउनमुळे प्रभावित झालेल्या गरजवंताना सात्रळ येथील इंदुस्वरुप मंगल कार्यालयात सकाळी १० ते १ या वेळेत अन्नछत्र सुरु असते. खासदार डाॅ. सुजयदादा विखे पाटील यांनी श्रीरामपूरसह प्रवरा परिसरातील जनतेला लाभ घेण्याच्या उद्देशाने अन्नछत्र सुरू केले आहे.
कोरोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी घालून दिलेली शारीरिक अंतराची सर्व नियम,आरोग्य,अन्नाची गुणवत्ता व दर्जा उत्तमपणे सांभाळून हे अन्नछत्र सुरु आहे. सात्रळ ,धानोरे,सोनगाव,पंचक्रोशीतील हजारो च्या संख्येने गरजुवंतानी लाभ घेत आहे.
यावेळी पद्मश्री डाॅ विठ्ठल राव विखे पा.सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन विश्वासराव कडु पा.यांच्या उपस्थितीत अन्न पाकीटचे वाटप सुरू आहे. विश्वासराव कडु पा. यांचेकडून अन्नाच्या दर्जा संदर्भातही काळजीपूर्वक माहिती घेवून काही त्रुटी आढळ्यास त्याची आपुलकिने दखल घेतली जाते.
यावेळी डॉ हरिभाऊ आहेर, प्रा मनोज परजने, प्रा दिपक घोलप, प्रा अविनाश अनाप, प्रा वासिमराज तांबोळी, प्रा सचिन अनाप, प्रा पंकज वारुळे, रमेश शिंदे, सुनील कडू, प्रदीप दिघे, रविंद्र दिघे या परिसरात जनतेला अन्नछत्रामधून वितरण होईपर्यत उपस्थित राहतात. माळेवाडी,डुक्रेवाडी,अनापवाडी, निंभेरे,तुळापुर ,कानडगाव, तांदुळनेर, गुहा, तांभेरे, कणगर, ताहाराबाद, रामपुर येथे सात्रळ येथील इदुंस्वरुप मंगल कार्यालयातुन वितरण केले जाते.