साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 मे 2020
टिळकनगर (वार्ताहर) श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे (टिळकनगर) येथील पत्रकार लालमोहमद जहागीरदार यांची नात व पत्रकार रिजवान जहागीरदार ह्यांची कन्या रुहीन रिजवान जहागीरदार वय 5 लहान चिमुरडीने रमजान महिन्याचा उपास यशस्वीपणे पार पडला.

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या उपास एप्रिल / मे या कडक उन्हाळ्यात सुरू झालेले आहे. या पुर्वी हे उपास पावसाळ्यात, हिवाळ्यात होत असे मात्र चालू वर्षात अत्यंत कडक उन्हाळ्यात उपास सुरू झाल्याने उपासकांची मोठी कसरत होत आहे. त्यामध्ये या लहान चिमुरडीने उपास ठेऊन सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. उपास यशस्वी पार पडला म्हणून रुहीन हिचे सर्व स्थरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
Tags
धार्मिक