साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 मे 2020
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) श्रीरामपूर शहरातील उम्मती फाऊंडेशन सेवाभावी संस्थेच्या वतीने शनिवारी ( दि.9) येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व इतरांना कोविड प्रोटेक्शन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन सर्व स्तरातून प्रयत्न करीत आहे. यात सर्वात महत्वाचा वाटा आरोग्य विभागाचा आहे. आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णालयात काम करीत आहेत. या आरोग्य सेवेत अर्थात हॉस्पिटलमध्ये काम कार्यरत डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणुन कोविड प्रोटेक्शन किटचे वाटप करण्यात आले. या प्रोटेक्शनच्या एका किट मध्ये 100 ग्लोव्हज, 50 मास्क, 50 कॅप, 100 टीशु पेपर, 5 सॅनिटीझर बॉटल अशा प्रकारे एक परिपूर्ण किट बनवुन देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
यावेळी मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती रिजवान म्हणाले कि, डॉक्टरांनी केलेले काम म्हणजे एक प्रकारची कुर्बानीच आहे. पवित्र ग्रंथ कुराणमध्ये सांगितले आहे कि प्रत्येक व्यक्तीने न्याय केला पाहिजे. अन्याय कोणी करू नये. तसेच सतत पुण्य करण्याचा प्रयत्न करावा. पापाला आयुष्यात थारा देऊ नये.आज या कोरोना विषाणू मुळे प्रत्येक जण हा तोंड लपवून(मास्क बांधून) फिरत आहे. अर्थात आपण परमेश्वराचे गुन्हेगार आहोत. म्हणून आज तोंड लपवण्याची वेळ आली आहे. डॉ जमधडे व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.वसंत जमधडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश बंड, डॉ.कौस्तुभ शेवंते,तसेच सर्वच कर्मचारी,उपस्थित होते. उम्मती फाऊंडेशनचे मुफ्ती रिजवान(धर्मगुरू), सोहेल बारूदवाला (अध्यक्ष, उम्मती फाउंडेशन), फिरोज पठाण (उपाध्यक्ष),डॉ.तौफिक शेख,अॅड.आरिफ शेख, डॉ.सुदर्शन रानवडे, नीरज शहा आदी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसापासून कोरान्टीन असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश बंड, डॉ.कौस्तुभ शेवंते, तसेच परिचारिका शैलजा मिसाळ हे सर्व आज रुग्णालयात दाखल झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उम्मती फौंडेशन तर्फ डॉक्टर वसंत जमधडे यांना 'कोरोना वॉरियर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.