श्रीरामपूर | मराठी साहित्यात कुठल्या शब्दाचा उगम कुठे झाला हा संशोधनाचा विषय असला तरी, मद्यपींना 'तळीराम' म्हणून संबोधने कितपत योग्य??? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते भैय्या भिसे यांनी उपस्थित केला आहे.
बेवड्यांना 'तळीराम' हा शब्द लावुन हिंदू धर्माचे आदर्श 'राम' या शब्दाला बदनाम करण्याचे कारस्थान ह्या हिंदूस्थानात होत असल्याचेही भिसे यांनी म्हंटले आहे.
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री (दारू) चालू ठेवावी की नाही यात अनेक मतप्रवाह आहे. सोशल मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियावर, वर्तमानपत्रात पेताड, दारुडे, बेवडे, टांगे, मद्यप्रेमी, ड्रिंकर असे अनेक उपाधी असणाऱ्या लोकांना 'तळीराम' हा शब्द उच्चारणे कितपद योग्य?? असा सवाल भिसे यांनी उपस्थित केला आहे.
ज्या प्रभू श्रीरामाने मानव जातीला सत्याच्या मार्गावर जगण्याचे शिकवले त्याच रामराज्यात आज बेवड्यांना तळीराम हा शब्द लावुन हिंदू धर्माचे आदर्श 'राम' ह्या शब्दाला बदनाम करण्याचे कारस्थान ह्या हिंदूस्थानात होत आहे. ज्या रामाच्या नावापुढे तुका लावले ते आज 'संत तुकाराम' झाले तरी पेताड, बेवडे, टांगे, यांना 'तळीराम' संबोधने हे कितपत योग्य हा संशोधनाचा विषय आहे. सोशल मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियात पेताडांना 'तळीराम' हा शब्द उच्चारू नये, असे भैय्या भिसे यांनी म्हंटले आहे.