Shrirampur : करण ससाणे यांच्या प्रयत्नाला यश ; श्रीरामपूरातील कृषी संबंधित हार्डवेअर आणि वर्कशॉपचे दुकानं खुले


साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 मे, 2020
श्रीरामपूर |प्रतिनिधी | शेती क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या श्रीरामपूरातील हार्डवेअर आणि वर्कशॉपचे दुकानं युवा नेते तथा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या प्रयत्नातून उघडण्यास परवानगी मिळाली आहे.

             गेल्या दिड महिन्यापासून कोरोना आजारांमुळे सर्वत्र संचारबंदी आहे त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. बाजार पेठेतील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना सोडून जवळजवळ बाकी दुकानं सगळे बंदच आहे. शेतीविषयक सर्व बाबींना संचारबंदीतुन वगळण्याचा शासनाचा प्रयत्न होता ; परंतु यामध्ये अनेक अडचणी येत होत्या.

            श्रीरामपुरातील शेतीच्या अनुषंगाने असणाऱ्या हार्डवेअर आणि वर्कशॉप संचारबंदीत खुले करण्यासाठी सदर दुकानदार संघटनेने प्रयत्न केले होते ; परंतु याला काही तांत्रिक अडचणी निर्माण होते होत्या. दुकानदार संघटनेने श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्याशी संपर्क साधला आणि येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्याची मागणी केली.  

            कृषी संबधीत हार्डवेअर आणि वर्क शॉप उघडण्यासाठी येत असलेल्या अडचणीबाबत ससाणे यांनी प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घेतली. आणि समयसूचकता दाखवत आमदार डॉ सुधीर तांबे आणि आमदार लहू कानडे यांच्याशी  संवाद साधला आणि श्रीरामपुरात शेतीच्या अनुषंगाने असलेल्या हार्डवेअर आणि वर्कशॉप बाबतच्या येत असलेल्या तांत्रिक अडचणी आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यात शेतीविषयक दुकानं चालू आहे श्रीरामपूरात काही तांत्रिक अडचणी आ.डॉ तांबेच्या निदर्शनास आणून दिले,  यावर आमदार डॉ.तांबे यांनी लगेचच श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार यांना सूचना देत सदर दुकानं आणि वर्कशॉप उघडण्याबाबत निर्णय घेण्याचे सांगितले.

            त्यामुळे करण ससाणे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश येऊन गेल्या पंधरा दिवसापासून श्रीरामपुरात शेतीच्या अनुषंगाने असलेले हार्डवेअर आणि वर्कशॉप सुरु होऊन शेतकऱ्यांनबरोबरच व्यापारी आणि वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. याकरीता प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

          हार्डवेअर आणि वर्कशॉपचे दुकानं सुरु झाल्याने दुकानदार संघटनेने आमदार डॉ तांबे, आ.कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post